मुंबई – 11 मार्च रोजी पहाटेच ईडीच्या चार ते पाच अधिकाऱ्यांनी कागलमधील माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड मारली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी-सकाळीच मुश्रीफ यांच्या घरी येऊन छाननी केली आहे. यावेळी ईडीकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. तब्बल साडे नऊ तास ही छापेमारी करण्यात आली होती.
साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित असलेल्या पुण्यातील व्यावसायिकांवर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने छापेमारी देखील केली होती. ईडीने पुणे शहरातील नऊ ठिकाणी छापे टाकले होते. हडपसर, गणेशपेठ, प्रभात रोड, सिंहगड रोड आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.
दरम्यान, आता या प्रकरणी हसन मुश्रीफ यांना कोर्टाने मोठा झटका दिला आहे. हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. जामीन अर्जाच्या निकालापर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण होते. मात्र ते संरक्षण आता संपले आहे. त्यामुळे हा हसन मुश्रीफ यांना हा मोठा झटका मनाला जात आहे.