मुंबई – बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या मदतीने राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. सध्या राज्यात शिंदे सरकार असल्याचं दिसून येत आहे. या घटनाक्रमाला अजून वर्ष सुद्धा झालेले नाहीत.
मात्र, अश्यातच आता मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या सर्व आमदारांना एकत्रित बोलावले असून, यामध्ये 40 आमदारांसह 10 अपक्ष आमदारांचा समावेश असणार आहे. आज एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्वच आमदारांची बैठक बोलावली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
दरम्यान, आजच्या या बैठकीत कोणत्या विषावर चर्चा होणार याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या बैठकीमुळे राज्यात काही राजकीय घडामोडी घडणार आहेत का? अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू झाली आहे. ही भेट कशासाठी आहे?
या मागचं कारण काय? बैठकीचा विषय काय? हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. साधारण दुपारी ही बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आजच्या बैठकीकडे लागल्या आहेत. यावेळी स्वतः एकनाथ शिंदे आपल्या सर्वच आमदारांशी सवांद साधतील.