मुंबई: सत्ता स्थापनेसाठी शिवसेना भाजपमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे. मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु आहे. आज मुंबईत भाजपच्या महाराष्ट्रातील नवनिर्वाचीत आमदारांची बैठक विधानभवनामध्ये पार पडली. दरम्यान, भाजप मुख्यमंत्रीपद, गृह, नगरविकास, अर्थ, महसूल सोडून इतर खात्यांवर शिवसेनेशी चर्चा करण्यास तयार आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. ” ब्रेकिंग न्युज…सत्तास्थापनेसाठी भाजपला ईडीचा पाठिंबा” असे ट्विट सावंत यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सत्तास्थापनेसाठी उशीर होत असल्यामुळे विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भाजवर टीका केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीची नोटीस आल्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते. भाजपने सत्तेचा दुरुपयोग करत स्वायत्त संस्थेचा कारभार हाती घेत असल्याची टीका त्यावेळी विरोधकांनी केली होती.
आता भाजप-शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून तणावाचे वातावरण असल्यामुळे विरोधकांनी संधी साधत भाजपला टोले लगावले आहेत.
BREAKING NEWS-
According to Confirmed sources ED is likely to extend support to @BJP4Maharashtra for forming the government in the state. ??
— Sachin Sawant (@sachin_inc) October 30, 2019