मुंबई – राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत असताना कोरोनाचा विषाणू आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानापर्यंत आधीच पोहोचला आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे.
रात्री रश्मी ठाकरे यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, त्या घरीच क्वारेंटाइन झाल्या आहेत. रश्मी ठाकरे यांची प्रकृती उत्तम असून, त्या घरीत क्वारेंटाइन झाल्या आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
रश्मी ठाकरे यांना करोनाचा संसर्ग झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीला व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे उपस्थिती लावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.