मुंबई – महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून दररोज सरासरी ५० हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र येत्या रविवारी (ता. 11) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा होणार होती. ही परीक्षा पुढं ढकलण्यात आली आहे.
रविवारी होणाऱ्या या परीक्षेला राज्यात ४ लाखाहून अधिक विद्यार्थी बसणार होते. मात्र करोनाची स्थिती पाहता या परीक्षेवरून संभ्रम निर्माण झाला होता. एमपीएससीच्या विद्यार्थ्या सरकार परीक्षा घेण्यावर ठाम आहे. मात्र या निर्णयाचा फेरविचार व्हावा अशी मागणी आता करण्यात आली आहे.
येत्या ११ एप्रिल २०२१ रोजी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी आज मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीत रविवारी होणारी एमपीएसची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्यात अनेक विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाली असून, काहीजण दुखणे अंगावर काढत आहेत. परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होते. अखेर आज परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय़ घेण्यात आला.