मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना करोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे.
राज आणि त्याच्या मातोश्री दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच राज यांनी तब्येतीमुळे पुणे दौरा रद्द केला होता. आज, त्यांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आलं आहे.