Breaking : वैज्ञानिकांना मोठं यश; करोना विषाणू 99.99 टक्के नष्ट करणारी थेरेपी विकसीत

मेलबर्न – करोना महामारीने संपूर्ण जगाला हैराण करून सोडलं आहे. या महामारीमुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देशांनी करोना प्रतिबंधक लसही बाजारात आणली आहे. मात्र लस घेतल्यानंतरही अनेकांना करोनाची लागण होत आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. मात्र आता एक दिलासादायक वृत्त आलं असून करोनाचा विषाणू 99.99 टक्के संपविणारी थेरपी विकसीत करण्यात ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांना यश आलं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मेंजीस हेल्थ इन्स्टिट्युट क्वीन्सलॅंडच्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या टीमने ही थेरेपी विकसित केली आहे. हे तंत्रज्ञान एका क्षेपणास्त्रासारखे काम करते. ते आधी आपल्या टार्गेटला शोधते आणि मग त्याला नष्ट करते, अस वैज्ञानिकांच्या टीममधील सदस्यांनी म्हटलं आहे.

विकसीत केलेल्या थेरपीमध्ये, करोना विषाणूला प्रतिकृती बनवण्यापासून रोखले जाते. जेणेकरून करोना विषाणूंची संख्या वाढण्यापासून रोखली जाते. यामुळे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी केले जाऊ शकते, असं संशोधन टीमच्या सदस्या नाईगेल मॅकमिलन यांनी सांगितलं. तसेच आधुनिक तंत्रज्ञान एका हीट-सिकिंग मिसाईलसारखे काम करते. हे तंत्रज्ञान आधी करोनाच्या विषाणूंची ओळख पटवते आणि त्यानंतर त्यावर हल्ला चढवते, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान ही थेरेपी जीन सायलेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. जीन सायलेन्सिंग थेरेपीचा शोध 1990 च्या दशकात ऑस्ट्रेलियात लावण्यात आला होता. श्वसनाशी संबंधित आजारांवर जीन सायलेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या थेरेपीमध्ये विषाणूंचा शोध घ्या आणि त्याला नष्ट करा, अशी कार्यपद्धती आहे. या थेरेपीच्या मदतीने व्यक्तीच्या श्वसन नलिकेत किंवा फुफ्फुसात असलेल्या विषाणूंना नष्ट करता येऊ शकतं.

असं काम करते ही थेरपी
या थेरेपीमध्ये नॅनो पार्टीकलला इंजेक्शनच्या माध्यमातून शरिरात सोडण्यात येते. हे नॅनोपार्टीकल फुफ्फुसात जावून आरएनए तयार करणाऱ्या पेशींमध्ये मिसळून जातात. त्यानंतर ते आरएनएमधील विषाणूंचा शोध घेऊन त्यांच्या जीनोमला संपवतात. त्यामुळे करोनाचा विषाणू दुसऱ्या विषाणूंना जन्म देऊ शकत नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.