गेल्या काही वर्षांपासून सुष्मिता सेन आपल्या प्रोफेशनल लाईफपेक्षा आपल्या पर्सनल लाईफवर जास्त लक्ष केंद्र करत आहे. तिच्या मुली आणि बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांच्याबद्दलचीच चर्चा गेल्या काही काळात सर्वाधिक झाली आहे.
मात्र सुष्मिताच्या अलिकडच्या पोस्टवरून तिच्यात आणि रोहमनमध्ये ब्रेक अप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. “व्यक्तीमध्ये बदल होईल, अशी आपल्याला अपेक्षा असते. मात्र तसे होत नाही. एखाद्या पुरुषाला चूक करताना वाटते की त्याची गर्लफ्रेंड सोडून जाणार नाही. मात्र ती खरेच निघून जाईल.’
अशी संदिग्ध पोस्ट सुष्मिताने इन्स्टाग्रामवर केली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये सध्या फारसे काही ठीक चाललेले नाही, असेच वाटते. सुष्मिताच्या फॅन्सनी या दोघांमध्ये ब्रेकअप व्हायला नको, अशा आशयाच्या कॉमेंटही केल्या आहेत. मात्र या कॉमेंटवर सुष्मिताने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे सुष्मिताने आपल्या कन्यांच्या बरोबर आणखी एक फोटोही शेअर केला आहे.
त्यालाही भरपूर लाईक मिळत आहेत. रोहमनबरोबर सुष्मिताच्या लग्नाची चर्चा गेल्या वर्षीपर्यंत सुरू होती. मात्र त्यानंतर सुष्मिताने याबद्दल बोलणेच बंद केले. सध्या तर ती बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. तिला आपल्या कन्यांच्या संगोपनातच अधिक रस वाटतो आहे.