नियम तोडणाऱ्यांवर विळखा

मालमत्ता नोंदणीकरणाच्या नियमात मर्यादेपेक्षा अधिक रोकड भरणाऱ्यांना प्राप्तीकर खात्याकडून नोटिसा पाठवण्यास सुरुवात झाली आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मर्यादेपेक्षा अधिक रक्कम भरणाऱ्या 27 हजार नागरिकांची खातरजमा करण्यात आली आहे.

प्राप्तीकर खात्याच्या तपासणीत 26 हजार 830 प्रकरणे समोर आली आहेत. सुमारे 7 हजार कोटी रुपयांहून अधिक रोखीने व्यवहार झाले असून त्यावर प्राप्तीकर खात्याची करडी नजर आहे. ही सर्व प्रकरणे असेसमेंट वर्ष 2018-19 या काळातील आहेत. त्यात पाच लाखांहून अधिक रोखीने रक्कम देणारे सुमारे 10 हजार प्रकरणे समोर आली. प्राप्तीकर कायदा कलम 271 नुसार रोख व्यवहारावर दंड आकारला जाऊ शकतो. मालमत्ता नोंदणीकरणानुसार 20 हजारांपेक्षा अधिक रोख व्यवहारावर निर्बंध आहेत. त्यात दिल्लीत 2000, हैदराबादेत 1700 प्रकरणे समोर आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.