पदपथावरील पेव्हर ब्लॉक तुटले

वडगाव शेरी –विमाननगर भागातील पदपथावरील पेव्हर ब्लॉक व पदपथाचे ठोकळे हे पदपथाच्या बाजूला तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. या तुटलेल्या ब्लॉकमुळे नागरिकांना चालताना त्रास होत आहे. फिनिक्‍स मार्केट सिटी, इनॉर्बिट मॉल व आय.टी. कंपन्या येथे आहेत. रोजच याठिकाणी प्रवासी व कामगारांची वर्दळ असते. या पदपथावरून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले जात असतात.

चालताना याठिकाणी एखाद्या व्यक्तीचा पाय अडकल्यामुळे मोठी दुखापत होऊ शकते. त्यातच या भागामध्ये बाहेरील पर्यटक व खरेदीसाठी येणाऱ्या लोकांची सकाळ, संध्याकाळ मोठी गर्दी असते. या पदपथाच्याच शेजारी वीज वीतरण विभागाच्या तारा या उघड्या अवस्थेत पडलेल्या आहेत. त्यांचा देखील जाताना-येताना पादचारी वर्गाला त्रास करावा लागतो. या पदपथांचे ब्लॉक हे व्यवस्थित करून नवीन बसविण्याची मागणी होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.