नगर – नवनागापूरातील गजानन कॉलनीत असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 28 हजार 700 रूपये किंमतीचे सोन्याची दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
चंद्रकांत वसंत मोरे (वय-28 रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) हे 6 डिसेंबर रोजी घर बंद करून, बाहेरगावी गेले होते. याचा फायदा चोरट्यांनी उठवत 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात दागिने लंपास केले.