123 नवीन रुग्णांची नोंद; पाच महिन्यानंतर मृत्यूसंख्या “शुन्य’वर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आज 123 नवीन रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने आज करोना मृत्यूला ब्रेक लागला आहे. जून महिन्यापासून शहरामध्ये दररोज मृत्यू होत होते. पाच महिन्यानंतर आज शहरातील मृत्यूची संख्या शून्य झाली आहे.
शहरामध्ये आजपर्यंत शहरामध्ये 88,802 जणांना करोनाची लागण झाली आहे. महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आज (रविवारी) चार वाजेपर्यंत शहरातील 123 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.
तसेच पाच महिन्यांनंतर एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सद्यस्थितीत शहरात 997 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 167 रुग्णांचाही समावेश आहे. आज दिवसभरात 101 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 85475 इतकी झाली आहे.
तर दिवसभरात 1433 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्याप 885 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.