धक्कादायक ! जगप्रसिद्ध गायकाचा संशयास्पद मृत्यू; 2 आठवड्यांपूर्वीच झालं होतं लग्न

नवी दिल्ली – जगभरात करोनाने थैमान घातलं असून अनेक सेलिब्रेटींचं करोनामुळे निधन झालं आहे. मात्र आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी आणि ब्राझिलचा प्रसिद्ध गायक एम.सी. केविन यांचं संशयास्पद निधन झालं आहे. दोन आठवड्यांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं.

रियो द जेनेरियो शहरातील एका हॉटेलमधील पाचव्या मजल्यावरून केविन खाली पडला. यात त्याचा मृत्यू झाला. केविन अवघ्या 23 वर्षांचा होता. एक तरूण कलाकर गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे. तसेच त्याच्या या संशयास्पद मृत्यूमुळे अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत. केविनचं दोन आठवड्यापूर्वीच लग्न झालं होतं. गर्लफ्रेंड डीओलेन बेजेरा हिच्याशी केविन विवाहबद्ध झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kevin Nascimento (@mckevin)

वास्तविक पाहता केविन या हॉटेलच्या 11 व्या मजल्यावर थांबला होता. मात्र आपल्या काही मित्रांची भेट घेण्यासाठी तो त्या हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर आला होता. आणि तेथील बाल्कनीत उभा असताना, तो अचानक खाली कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. केविनच्या या रहस्यमयी मृत्यूचा स्थानिक पोलीस तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.