नवी दिल्ली : ब्राझीलचे राष्ट्र्पती जयरे मोसियास बोलसोनारो उद्या भारत दौर्यावर येत आहेत. ते 27 जानेवारी पर्यंत भारताच्या राजकीय भेटीवर राहतील. दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी सोहळ्याचे ते प्रमुख पाहुणे असतील.
अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय ठाकुर सिंह यांनी माध्यमांना दिली. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत आठ मंत्री, चार खासदार, वरिष्ठ अधिकारी आणि शिष्टमंडळ असेल.
25 जानेवारीला राष्ट्रपती भवनच्या प्रांगणात राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांचे औपचारिक स्वागत होईल. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींशी विविध विषयांवर चर्चा करतील. तसेच दोन्ही देशांमधील अनेक करारांवर सह्या होण्याचीही शक्यता आहे. राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बोलसोनारो यांची ही पहिली भारत भेट आहे.