ब्राझीलचा गॆरसोन व्हिएरा आता एटीकेमध्ये 

कोलकाता: ब्राझिलियन डिफेंडर गॆरसोन  व्हिएरा हा इंडियन सुपर लीगच्या पुढील मोसमासाठी अथलेटिको माद्रिद  कोलकाता (एटीके) या संघातून खेळणार आहे. मागील दोन मोसम मुंबई एफसी संघासाठी त्याने उत्तम कामगिरी केली होती. २०१६ च्या मोसमात मुंबईला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवून देण्यात त्याने मोठी कामगिरी बजावली होती.

२०१६ मध्ये इंडियन सुपर लीगमध्ये त्याने मुंबई एफसी संघाकडून खेळताना पदार्पण केले होते. त्यावर्षी साखळी सामन्यात मुंबईच्या संघाने अव्वल क्रमांक पटकावत प्रथमच प्ले ऑफमध्ये स्थान पटकावले होते. त्यानंतर त्यांना सेमीफाइनलमध्ये एटीकेविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गॆरसोन व्हिएराने २००९ मध्ये झालेल्या १७ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकात ब्राझीलच्या संघाचे नेत्रुत्व केले होते. सध्याच्या ब्राझीलच्या संघातील मुख्य खेळाडू नेमार, कॅसेमीरो, फिलिप कॉटिन्हो आणि गोलकीपर ऍलिसन हे त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेले आहेत.

एटीकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीव्ह कोप्पेल म्हणाले की, ” व्हिएरा हा खूप प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्या कौशल्याचा आणि नेतृत्वगुणांचा खूप चागला प्रभाव आमच्या संघावर होईल. मी त्याचे एटीकेच्या कुटुंबामध्ये स्वागत करतो.”

भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली हा या संघाचा सह संघमालक  आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)