Brandon Clarke : बास्केटबॉल खेळाडू खेळाडू ब्रँडन क्लार्क (Brandon Clarke) यांचे अवघ्या २९ व्या वर्षी निधन झाले आहे. एनबीएने त्यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली आहे. लॉस एंजेलिसमधील एका घरात ते मृत अवस्थेत आढळले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालेले नाही. मात्र TMZ स्पोर्ट्स आणि इतर माध्यमांच्या वृत्तानुसार, पाराफेर्नेलिया (ड्रग पॅराफर्नेलिया) नावाच्या औषध-संबंधित वस्तूंच्या ओव्हरडोजमुळे त्यांचा मृत्यू (Brandon Clarke) झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांना त्यांच्या घरात ड्रग पॅराफर्नेलिया सापडल्याची माहिती आहे. क्लार्क (Brandon Clarke) यांनी या हंगामात दुखापतीमुळे केवळ दोनच सामने खेळले होते. त्यांच्या संपूर्ण एनबीए कारकिर्दीत त्यांनी एकूण ३०९ सामने खेळले होते. मेम्फिस ग्रिझलीज संघासाठी सात हंगाम खेळणारे क्लार्क बेंचवरून प्रभावी योगदान देणारे खेळाडू म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक निधनाने बास्केटबॉल विश्वात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. Brandon Clarke टीमचा भावनिक प्रतिसाद मेम्फिस ग्रिझलीज संघाने एका निवेदनात म्हटले आहे की, “अवघ्या २९ वर्षांच्या ब्रँडन क्लार्कच्या मृत्यूने आम्हाला प्रचंड धक्का बसला आहे. तो नेहमीच आमच्या स्मरणात राहील. आम्ही त्याला कधीही विसरू शकणार नाही.” क्लार्क यांचा उबदार स्वभाव, टीमसोबतची बाँडिंग आणि मैदानाबाहेरची कामे यामुळे ते सहकाऱ्यांमध्ये प्रिय होते. ब्रँडन क्लार्क यांचा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा आढावा जन्म आणि पार्श्वभूमी ब्रँडन क्लार्क यांचा जन्म कॅनडातील व्हँकुव्हर येथे झाला. त्यांच्याकडे कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशांचे नागरिकत्व होते. ते तीन वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब कॅनडातून अमेरिकेत स्थलांतरित झाले. एनबीए कारकीर्द ग्रिझलीज संघासाठी खेळताना त्यांनी चार वेळा प्ले-ऑफ्समध्ये प्रवेश केला होता. दुखापतींमुळे त्यांची कारकीर्द पूर्णपणे फुलू शकली नाही, तरीही ते एक प्रभावी बेंच प्लेयर म्हणून प्रसिद्ध होते. नेटवर्थ विविध अंदाजानुसार त्यांची एकूण नेटवर्थ सुमारे ६४.१५ मिलियन डॉलर (सुमारे ५४०-६१४ कोटी रुपये) इतकी होती.