ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली – भारतीय हवाईदलाने आज एसयू-30 एमकेआय लढाऊ विमानाद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला. सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे वजन 2.5 टन असून, ते हवेतून 300 किलोमीटरवरील जमिनीवरच्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. ब्राह्मोस एअरोस्पेस प्राइवेट लिमिटेड (बीएपीएलने) ते विकसित केले आहे.

भारतीय हवाई दलाच्या अभियंत्यांनी यासाठी विमानाचे सॉफ्टवेअर विकसित केले असून, हिंदुस्तान एअरोनॉटिक्‍स लिमिटेडने यांत्रिक आणि विद्युत अद्ययावतीकरण केले आहे. विमानातून हे क्षेपणास्त्र सुनियोजितपणे सोडण्यात आले आणि नियोजित लक्ष्याचा त्याने थेट वेध घेतला असे हवाई दलाचे प्रवक्‍ते ग्रुप कॅप्टन अनुपम बॅनर्जी यांनी सांगितले.

हवेतून जमिनीवर अचूक लक्ष्य करणाऱ्या प्रणालीचा यंत्रणेद्वारे 2.8 मॅच उंचीवरून थेट जमिनीवरील लक्ष्य गाठणारे भारतीय हवाई दल जगातील पहिले हवाई दल ठरले आहे. भारतीय हवाई दलाने ही कामगिरी 22 नोव्हेंबर 2017 रोजी केली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.