“ब्रम्हास्त्र’ची रिलीज डेट पुन्हा बदलली

मुंबई – ब्रम्हास्त्र’ थिएटरला बघण्यासाठी प्रेक्षकांना आता खूप वाट बघायला लागू शकते. या सिनेमाची रिलीज डेट पुन्हा एकदा बदलली आहे. आता पुढच्या वर्षी हिवाळ्याच्या सुटीमध्येच या सिनेमाचा आनंद घेणे प्रेक्षकांना शक्‍य होईल, असे वाटते आहे. “ब्रम्हास्त्र’चे शूटिंग जवळपास संपले आहे. आता त्याचे पोस्ट प्रॉडक्‍शनचे काम सुरू आहे.

त्यात “व्हीएफएक्‍स’चे इफेक्‍ट देण्यासाठी खूप वेळ लागतो आहे. अजून बरेच काम बाकी आहे. नियोजित वेळापत्रकामध्ये हे काम पूर्ण होईल अशी शक्‍यता दिसत नाही. रणबीर कपूर, आलिया भट आणि अमिताभ बच्चन यांच्या महत्वाच्या सीनला “व्हीएफएक्‍स’चे इफेक्‍ट देणे बाकी आहे. त्याशिवाय अलिकडेच शाहरुख खानवर चित्रीत करण्यात आलेल्या सीनलाही हे इफेक्‍ट देणे बाकी आहे.

ज्या कंपनीकडे “व्हीएफएक्‍स’चे काम सोपवले गेले आहे, त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये 2020 च्या उन्हाळ्यापूर्वी हे काम पूर्ण केले जाऊ शकणार नाही, असे दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि निर्माता करण जोहर यांना स्पष्टपणे सांगितले आहे. अर्थात यामुळे अयान मुखर्जी आणि करण जोहर फारसे खूष नाहीत. मात्र प्रेक्षकांसमोर अर्धवट इफेक्‍ट असलेली कलाकृती आणण्यास ते राजी नाहीत. त्यामुळे पुढच्या वर्षी हिवाळ्यातच “ब्रम्हास्त्र’ रिलीज करण्यावाचून कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.