राज्यातील निवडणुकीवर बहिष्कार टाका

नक्षलवाद्यांकडून पत्रके वाटप करून आवाहन

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून राज्यात प्रचाराचा धुरळा उडत असल्याचे दिसत आहे. परंतू, तिकडे गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी राज्यातील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

आज गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रचार सभा होणार आहे. या प्रचार सभेच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांची पत्रके सापडली आहे. यामध्ये नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. अमित शहा यांची आलापल्ली येथे प्रचारसभा होणार आहे. या प्रचारसभेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमध्ये कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अमित शहांच्या प्रचारसभेच्या पार्श्वभूमीवर भामरागड तालुक्‍यातील भामरागड-लाहेरी मुख्य मार्गावरील मौजा मल्लमपोडूर इथे नक्षलवाद्यांनी पत्रके आणि बॅनर लावले आहेत. 21 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाका. तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजपसह सर्व राजकीय पक्षांवर देखील बहिष्कार टाका, असे आवाहन या बॅनर्सच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.