गाव महापालिकेत समावेशाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी घेतला पवित्रा
– विवेकानंद काटमोरे
मांजरी – शेवाळेवाडी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक गाव महापालिकेच्या हद्दीत समावेश होतानाच जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे संभ्रमावस्थेत असलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत गावच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात निर्णय घेतला आहे. गावच्या हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेत गाव समावेश करण्याची अधिसूचना बुधवारी (दि.23) काढण्यात आली. यामध्ये शेवाळेवाडी गावचा ही समावेश आहे. पालिका समावेश आणि ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया एकाच वेळी सुरू असल्याने गावचे नेते आणि ग्रामस्थही संभ्रमात आहेत. दि. 23 ते 30 डिसेंबर अर्ज भरणे तर दि. 15 जानेवारीला मतदान होत आहे, असे असताना आज सर्वपक्षीय नेते व नागरिकांनी एकत्र येत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
यावेळी पंढरीनाथ शेवाळे, अशोक मोरे, राहुल शेवाळे, विक्रम शेवाळे, अशोक शेवाळे, संजय शेवाळे, बबन शेवाळे, भारती शेवाळे, पोपट कामठे, प्रवीण चोरघडे, संजय कोद्रे, विजय कोद्रे, वसंत शेवाळे, अशोक शिंदे, अमित पवार, दिनेश भंडारी, रामभाऊ अक्काले, संजय कामठे, सचिन शेवाळे, जीवन शेवाळे, अक्षय शेवाळे, कुणाल शेवाळे, श्याम शेवाळे, अमोल शेवाळे, अविनाश कोद्रे, अमोल जगताप आदी उपस्थित होते.
शेवाळेवाडी गावची निवडणूक रद्द झाल्याबद्दल अधिसूचना निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यधिकारी कार्यालयात जोपर्यंत अशी अधिसूचना येत नाही तोपर्यंत शेवाळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया चालू राहील.
– व्यंकटेश चिरमुल्ला, मंडल अधिकारी, निवडणूक अधिकारी, हडपसर