युवकाने ऑक्सिजन मिळत नसल्याची केली तक्रार; मोदी सरकारमधील मंत्र्याने दिली थोबाडीत मारण्याची धमकी

दमोह – देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. यामुळे नेत्यांना आणि मंत्र्यांना रोषाला सामोरं जाव लागत आहे. मात्र मध्य प्रदेशात ऑक्सिजन मिळत नसल्याची तक्रार करण्यास गेलेल्या व्यक्तीला केंद्रीयमंत्र्यांनीच धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे.

मध्य प्रदेशातील दमोह येथील कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल गेले होते. यावेळी येथे एका युवकाने आपल्या करोनाबाधित मातेसाठी ऑक्सिजन सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार केली. यावर केंद्रीयमंत्री पटेल भडकले आणि पुन्हा असं बोलशील तर दोन थोबाडीत देईल. त्यावर युवक गप्प बसला नसून दोन थोबाडीत मारा पण ऑक्सिजनची व्यवस्था करण्याची विनवणी त्याने केली.

मागील दोन दिवसांपासून दमोहचे खासदार आणि मंत्री प्रल्हाद पटेल गायब असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टनंतर पटेल यांनी मतदार संघातील कोविड सेंटरला भेट दिली.  यावेळी त्यांनी कोविड सेंटरच्या बाहेर असलेल्या करोनाबाधितांच्या नातेवाईकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी युवकाने ऑक्सिजन मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्यावरून केंद्रीय मंत्री संतापले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.