नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक पात्रता फेरीचे आयोजन चीनमध्ये ३ ते १४ फेब्रुवारी २०२० दरम्यान होणार आहे. या पात्रता स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी झालेल्या चाचणीत ५ महिला बाॅक्सरपटूनी भारतीय संघात आपले स्थान निश्चित केलं आहे.
यामध्ये एम.सी.मेरीकोम (५१ किलो), साक्षी चौधरी (५७ किलो), सिमरनजित कौर (६० किलो), लवलीना बोरगोहेन (६९ किलो) आणि पूजा राणी (७५ किलो) यांचा समावेश आहे.
All the best to the women's #Boxing squad that qualified for Olympic qualifiers –
51kg @MangteC
57kg #SakshiChaudhary
60kg @Simranjitboxer
69kg @LovlinaBorgohai
75kg #PoojaRaniThe Olympic Qualifiers will take place from Feb 3 to 14 in Wuhan, China@KirenRijiju @BFI_official
— SAI Media (@Media_SAI) December 30, 2019
सहावेळा जागतिक विजेती मेरी कोमने माजी कनिष्ठ विश्वविजेती निकहत झरीन हिचा ९-१ असा पराभव करीत ५१ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला. अन्य लढतीत सोनिया लाठोरला ५७ किलो वजनी गटात साक्षी चौधरीने तर ६० किलो गटात सरितादेवीला सिमरनजित कौरने पराभूत केलं.
जागतिक स्पर्धेत कांस्यपदक विजेती असलेली लवलीना बोरगोहेन हिने ६९ किलो गटात ललिताचा तर आशियाई स्पर्धेची माजी कांस्य पदक विजेती पूजा राणी हिने नूपूरचा पराभव करीत ७५ किलो गटात ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला.