बोक्‍साम बॉक्‍सिंग : मेरी कोम उपांत्य फेरीत

नवी दिल्ली – भारताची स्टार मुष्टियुद्ध खेळाडू सुपरमॉम एम. सी. मेरी कोमने (51 किलो) बोक्‍साम आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

37 वर्षीय मेरीने करोनाच्या धोक्‍यानंतर जवळपास एक वर्षाने स्पर्धात्मक स्तरावर पुनरागमन करताना उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या गिओर्डाना सारेंटिनोचा विभाजीत निकालद्वारे पराभव केला. उपांत्य फेरीत तिची अमेरिकेच्या व्हर्जिनिया फ्यूशशी गाठ पडणार आहे.

पुरुष गटात मनीष कौशिकने स्पेनच्या अमारी रुडॉल्फचा 5-0 असा पराभव केला. त्याचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना आता कझाकस्तानच्या सुफिउल्लीन झाकीरशी गाठ पडणार आहे.
संघटनेवर काम करायची मेरीला संधी मेरी कोमला आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेच्या (एआयबीए) सदस्य मंडळात काम करण्याची संधी मिळाली आहे. संघटनेच्या विजेत्या तसेच वरिष्ठ समितीच्या अध्यक्षपदी तिची निवड करण्यात आली. या समितीची स्थापना दोन वर्षांपूर्वी करण्यात आली असून जगभरातील नावाजलेल्या मुष्टियुद्ध खेळाडूंची वर्णी या समितीत लावण्यात आली आहे.

पूजा राणी उपांत्य फेरीत

भारताची आशियाई विजेती पूजा राणी हिने 75 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली व पदक निश्‍चित केले. उपांत्यपूर्व फेरीत तिने इटलीच्या असुंटा कॅनफोराचा पराभव केला. राणीने आशियाई स्पर्धेत तीन वेळा पदक पटकावले असून 2014 सालच्या एशियन गेममध्ये ब्रॉंझपदकही जिंकले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.