#Boxing : मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या चानूला सुवर्ण

नवी दिल्ली – भारताची अव्वल महिला मुष्टियुद्ध खेळाडू टी. सानामाचा चानूने 75 किलो वजनी गटात मॉंटेनेग्रो येथील आद्रिआटिक पर्ल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत तीन सुवर्णपदके मिळविली आहे.

या दोन सुवर्णपदकांखेरीज भारताने दोन रजत व तीन ब्रॉंझपदकांची कमाई केली. रोहतच्या विंकाने आपल्या वेगवान खेळाने मोल्डोवाच्या क्रिस्तिना क्रिपेर हिला 5-0 असे पराभूत केले. सानामाचा हिने देखील प्रतिस्पर्धी राज साहिबा हिचा 5-0 असा पराभव केला.

अन्य लढतीत 48 किलो गटाच्या सुवर्ण लढतीत गितिकाला उझबेकिस्तानच्या फार्झोना फोझिलोवा हिच्याकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला. यजमान देशाच्या बोजना गोकोविच हिने 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावताना भारताच्या प्रियांशु डबास हिचा पराभव केला.

भारताच्या लकी राणा हिने 64 किलो वजनी गटातून उपांत्य फेरी गाठली. अंतिम फेरीत तिची गाठ आता फिनलॅंडच्या लिया पुकिला हिच्याशी पडणार आहे. बेबीरोजीसाना चानू (51) आणि अरुंधती चौधरी (69 किलो) यांनी अंतिम फेरी गाठली. सुवर्णपदकासाठी त्यांची लढत अनुक्रमे सबिना बोबोकु लोवा आणि मरियाना स्टोकिलो यांच्याशी होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.