नवी दिल्ली : टोकियो आॅलिम्पिक पात्रता फेरीचे आयोजन चीनमध्ये ३ ते १४ फेब्रुवारी २०२० दरम्यान होणार आहे. या पात्रता स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी झालेल्या चाचणीत ८ बाॅक्सरपटूनी भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे.
यामध्ये अमित पंघाल (५२ किलो), गौरव सोलंकी (५७ किलो), मनीष कौशिक (६३), विकास कृष्ण (६९),आशियाई रौप्यपदक विजेता आशीष कुमार (७५ किलो), सचिन कुमार (८१ किलो), नमन तंवर (९१ किलो) आणि अनुभवी सतीश कुमार( ९१ किलोवरील) यांनी ३ ते १४ फेब्रुवारी २०२० दरम्यान चीनमध्ये होणा-या आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय पुरूष संघात स्थान पटकावले आहे.
आशीष कुमार याने राष्ट्रीय चॅम्पियन अंकित खटाना याचा, सतीश कुमारने नरेंदरचा तर सचिन कुमारने बृजेश यादव यांचा चाचणी स्पर्धेत पराभव केला. याशिवाय गौरव सोलंकीने मोहम्मद हसमुद्दीनचा, विकास कृष्णने दुर्योधन नेगीचा तर नमन तंवरने नवीन कुमारचा पराभव करत भारतीय संघात स्थान मिळवले.
दरम्यान, अमित पंघाल आणि मनीष कौशिक यांनी यापूर्वीच संप्टेबरमध्ये झालेल्या जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक जिंकत भारतीय संघात स्थान पटकावले आहे.
All the best to men's #Boxing squad that qualified for Olympic qualifiers in Wuhan, China ( Feb 3 to 14, 2020)
52kg @Boxerpanghal
57kg #GauravSolanki
63kg #ManishKaushik
69kg @officialvkyadav
75kg #AshishKumar
81kg #SachinKumar
91kg #NamanTanwar
91kg+#SatishKumar— SAI Media (@Media_SAI) December 30, 2019