टोकियो – भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमला 51 किलो वजनी गटात हार पत्करावी लागली आहे. या पराभवामुळे मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकमधून बाहेर पडलीय. आजच्या या पराभवामुळे तमाम भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. मेरी कोमकडून सर्वांना पदकाची अपेक्षा होती. महिला बॉक्सिंगच्या उपांत्यपूर्व फेरीत तिला कोलंबियाच्या तिसर्या मानांकित इंग्रीट वलेन्सियाकडून मेरी कोमला पराभव पत्करावा लागला.
महिला 51 किलो गटात कोलंबियाच्या इन्ग्रिट वलेन्सियाकडून पराभव झाल्याने भारताच्या मेरी कोमचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात आला आहे.मेरी कोमने याआधी दोन वेळा कोलंबियन बॉक्सरचा सामना केला होता आणि दोन्ही सामने जिंकले होते. ज्यामध्ये २०१९ च्या जागतिक अजिंक्यपदांच्या उपांत्यपूर्व फेरीचा समावेश होता.
असा झाला सामना
– पहिली फेरी कोलंबियाच्या बॉक्सरकडून 1-4 असा पराभव
– दुसरी फेरीत मेरीचे जोरदार पुनरागमन;वलेन्सियावर 3-2 असा विजय
– तिसऱ्या फेरीत व्हॅलेन्सियाने केवळ पुनरागमन केले नाही तर सामना 3-2 ने जिंकला.
पंचांनी व्हॅलेन्सियाला अनुक्रमे 30, 29, 27, 29 आणि 28 गुण दिले. त्याच वेळी मेरी कोमला 27, 28, 30, 28 आणि 29 गुण मिळाले.
“Some sports have legends, some have Mary Kom.”
The legendary boxer from #IND gave it her all and then bowed out with a smile on her face 🙌
Some champion stuff right there! 🙇#Tokyo2020 | #BestOfTokyo | #Boxing | #StrongerTogether | #UnitedByEmotion @MangteC pic.twitter.com/P8hStrvU9n
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) July 29, 2021
मेरी कोमचे हे शेवटचे ऑलिम्पिक होते. या पराभवाने तिचाऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात आला. ३८ वर्षीय मेरी कोम सहा वेळा विश्वविजेते असून ती भारताची महान महिला बॉक्सर आहे. मेरी कोम सामन्यानंतर भावनिक दिसत होती. रेफरीने कोलंबियन बॉक्सरला विजेता घोषित केल्यानंतरही सामन्याचा निकाल जाहीर झाल्यावर तिने आनंद व्यक्त केला. या दरम्यान मेरी कोम सतत हसत होती.
यापुढे ऑलिम्पिकमधील मेरी कोमचा हा शेवटचा सामना होता. पुढच्या ऑलिम्पिकमध्ये 38 वर्षीय मेरी 41 वर्षांची होईल. 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होणार आहेत.