पुणे – अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा राजीव गांधी स्मारक समिती आणि पुणे हौशी मुष्टियुद्ध संघटनेच्या मान्यतेने आज (गुरुवार) होणार आहे.
ही स्पर्धा बाबूराव सणस स्पोर्टस ग्राउंड येथे दुपारी 4 वाजता होणार आहे. रात्री आठ वाजता स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रमेश बागवे व सचिव मदन वाणी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक व निमंत्रक गोपाळ तिवारी यांनी दिली आहे.