नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत सरस कामगिरी केलेल्या मुष्टियुद्ध खेळाडूंना जागतिक स्पर्धेसाठी थेट पात्रता देण्यात आली आहे.
इस्तंबूलमध्ये येत्या डिसेंबरमध्ये होत असलेल्या या स्पर्धेसाठी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची थेट निवड करण्यात आली असून त्यात टोकियोतील ब्रॉंझपदक विजेती लवलिना बोर्गोहेनचा समावेश आहे.
भारताला या स्पर्धेत लवलिनाकडून 69 किलो गटात पदकाची अपेक्षा आहे. ही निवड करताना या खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत न खेळण्याची सवलतही देण्यात आली आहे.