नवी दिल्ली : उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी सापल्यामुळे भारताचा बाॅक्सर सुमित सांगवान याच्यावर राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन प्रतिबंधक समिती म्हणजेच ‘नाडा’कडून एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे.
Olympian boxer Sumit Sangwan suspended for one year for failing a dope test. #NADA
— Press Trust of India (@PTI_News) December 26, 2019
वर्ष २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये सांगवान ९१ किलो वजनी गटात सहभागी झाला होता. आॅलिम्पिक पात्रता निवड चाचणी स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली होती. बंदी असलेल्या उत्तेजकांचे सेवन केल्यामुळे सुमितवर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे, असे नाडाचे महासंचालक नवीन अगरवाल यांनी सांगितले.