बॉक्‍सर अमित पंघालची ऐतिहासिक कामगिरी

बॉक्‍सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश

नवी दिल्ली : भारताचा बॉक्‍सर अमित पंघाल याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बॉक्‍सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. दरम्यान, अमित पंघाल हा विश्वविजेतेपदाच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्‍सर आहे. भारताच्या अमित पंघालने बॉक्‍सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अमितने 52 किलो गटातील उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या सकन बिबिसनोव्हला 3-2 असे हरवले.

शनिवारी अंतिम सामन्यात रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या शाखोबिदिन झिरोवचा सामना अमितशी होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या अमित पंघालने 52 किलो गटातील उपांत्य सामन्यात कझाकस्तानच्या सकाने बीबीसनोव्हचा 3-2 असा पराभव केला. बॉक्‍सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा अमित हा पहिला भारतीय पुरुष बॉक्‍सर आहे. आतापर्यंत पाच भारतीय पुरुष बॉक्‍सर्सने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. 2009 मध्ये विजेंदर सिंगने हे कामगिरी केली होती, तर विकास कृष्णनने 2011 मध्ये तर शिव थापाने 2015 मध्ये उपांत्य फेरीपर्यंत प्रवेश केला होता. आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे पंचलने म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)