आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि दक्षिण अमेरिका आदी देशांमध्ये दर्शकांचे मनोरंजन केल्यानंतर आता अमेझॉन प्राइम व्हिडिओने भारतात इंटरनॅशनल अमेझॉन ओरिजिनल सीरिज “एलओएल’च्या लोकल व्हर्जनची घोषणा केली आहे. या शोला बोमन ईराणी आणि अर्शद वारसी होस्ट करणार आहेत.
“एलओएल-हंसे तो फंसे’ हा विना स्क्रिप्टचा एक कॉमेडी रिएलिटी शो आहे. या शोमध्ये सलग 6 तास 10 प्रोफेशनल एकमेकांसमोर सादरीकरण करणार आहे. यामागे दोन उद्देश आहे. एक म्हणजे हा शो सादर करताना उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना हसविणे आणि दुसरा म्हणजे त्यांनी अन्य कॉमेडियन यांनाही हसविणे. परंतु असे करताना त्यांना स्वतः हसता येणार नाही. या शोमध्ये चेहऱ्यावर कोणतेही हास्य न दाखविता शेवटपर्यंत सादरीकरण करणारा हा विजेता ठरणार आहे.
भारतात होणाऱ्या या शोमध्ये प्रसिद्ध कॉमेडियन आदार मलिक, आकाश गुप्ता, अदिती मित्तल, अंकिता श्रीवास्तव, साइरस ब्रोचा, गौरव गेरा, कुशा कपिला, मल्लिका दुआ, सुनील ग्रोवर, सुरेश मेनन आदी परफॉर्मेन्स दाखविणार आहेत. यावेळी होस्ट म्हणून बोमन ईराणी आणि अर्शद वारसी
झळकणार आहे.