#ICCWorldCup2019 : विडींजच्या गोलंदाजांनी स्वत:चे स्थान निर्माण करावे- रॉडी इस्टविक

साउदम्पटन – वेस्ट इंडीजच्या सध्याच्या पिढीतील गोलंदाजांकडे वर्चस्व गाजविण्याइतकी भेदकता व वेग आहे, त्यांनी अचूक टप्पा व दिशा ठेवीत मारा कराबा आणि त्याद्वारे स्वत:चे स्थान निर्माण करावे असे विडींजचे सहाय्यक प्रशिक्षक रॉडी इस्टविक यांनी सांगितले.

विडींजच्या ओशाने थॉमस, शेल्डॉन कॅट्रिल, कार्लोस ब्रेथवेट व आंद्रे रसेल यांनी यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेत आतापर्यंत प्रभावी मारा केला आहे. त्याबाबत समाधान व्यक्त करीत इस्टविक म्हणाले, आमच्याकडे जोएल गार्नर, मायकेल होल्डींग, कोर्टनी वॉल्श आदी अनेक भेदक गोलंदाज होते. त्यांच्याशी सध्याच्या गोलंदाजांची तुलना होणे स्वाभाविक आहे. त्यांचा आदर्श जरूर ठेवला पाहिजे. मात्र त्यांचे अनुकरण न करता त्यांनी चांगल्या नैपुण्याच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली पाहिजे.

इस्टविक यांनी पुढे सांगितले की, जेसन होल्डर हा संघाचे कर्णधार उत्तम प्रकारे सांभाळत आहे. त्याच्या संघातील खेळाडूंना येथे व मायदेशातही चांगले चाहते लाभले आहेत. आमच्या देशातील क्रिकेट क्षेत्र सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे. सध्याचे खेळाडू भरपूर यश मिळवित आमच्या क्रिकेटला संजीवनी देतील अशी मला खात्री आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.