मुंबई – कोरोना विषाणूने साऱ्या जगात धुमाकुळ घातल्यानंतर आता चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या घरातही शिरकाव केला आहे. बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ आणि त्यांचा मुलगा अभिनेता ‘अभिषेक बच्चन’ यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णायलमध्ये दाखल करण्यात आले.
T 3590 -I have tested CoviD positive .. shifted to Hospital .. hospital informing authorities .. family and staff undergone tests , results awaited ..
All that have been in close proximity to me in the last 10 days are requested to please get themselves tested !— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 11, 2020
दोघांनाही आपआपल्या ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भातील माहिती दिली. यानंतर ट्विटवर अमिताभ यांना या आजारामधून लवकर बरं होण्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली असून अमिताभ आणि अभिषेकला गेट वेल सूनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Earlier today both my father and I tested positive for COVID 19. Both of us having mild symptoms have been admitted to hospital. We have informed all the required authorities and our family and staff are all being tested. I request all to stay calm and not panic. Thank you. 🙏🏽
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) July 11, 2020
दरम्यान, अश्यातच अमिताभ यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यामध्ये ते नानावटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धन्यवाद देताना दिसत आहेत.
View this post on Instagram
#amitabhbachchan had made this video to thank the covid warriors of Nanavati hospital
यामध्ये बि बींनी डॉक्टरांचे खूप आभार मानले आहेत. डॉक्टरांना देवाची उपमा दिली आहे. कोरोनाच्या महासंकटात देवासारखं जीव वाचवण्याचं काम ते करत असल्याचं बिग बी म्हणाले. त्यांनी डॉक्टरांचे खूप आभारही मानले आहेत. अमिताभ यांनी हा व्हिडिओ 20 मे रोजी पोस्ट केला होता.