बोटा येथे सरकारी शिधावाटपाची पॉस मशीन फोडली

संगमनेर – शासनाच्या स्वस्त धान्य दुकानात रेशन घेण्यासाठी गेले असता पॉस मशीनवर हाताच्या बोटांचे ठसे ठेवल्यानंतर नाव न आल्याच्या रागातून कार्ड धारकाने धान्य वाटपाची पॉस मशीन फोडून नुकसान केले. ही घटना बोटा येथे शुक्रवार (30 ऑगस्ट) दुपारी घडली. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राजू रामदास कालेकर रा. कुरकुटवाडी असे मशीन फोडल्याने गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.

कालेकर शुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान बोटा सोसायटी येथील सरकारी शिधावाटप दुकानात शिधापत्रिकेवरील धान्य घेण्यासाठी आले होते. त्यावेळी धन्य दुकानदार सौरभ नामदेव शेळके यांनी त्यांची शिधापत्रिका पाहून त्यांना पॉस मशीनवर हाताच्या बोटांचे ठसे ठेवल्यासं सांगितले.

त्यांनी हाताची बोटे पॉस मशीनवर ठेवली असता त्यांचे नाव न आल्याने त्याचा राग मनात धरून दुकानातील 22 हजार रुपये किंमतीची पॉस मशीन जमिनीवर आपटून फोडून नुकसान केले. या घटनेची माहिती दुकान चालक शेळके यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना दिली. गुन्हा दाखल केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.