पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे शनिवारी एकूण 69 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
कोविशिल्डचे 58 केंद्रांवर प्रत्येकी 200 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, कोवॅक्सिनचे 11 केंद्रांवर 300 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोविशिल्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 10 टक्के असून, ऑन दी स्पॉट बुकिंगही 10 टक्के आहे.
तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 10 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 10 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
2 जुलैपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना जी लस मिळणार आहे त्याचे ऑनलाइन बुकिंग 40 टक्के होणार आहे. 28 ऑगस्टला कोवॅक्सीनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांना 40 टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे मिळेल.