विधान परिषदेवर राष्ट्रवादीतील या दोघांची वर्णी

मुंबई: सहा वर्षपूर्वी विधानपरिषदेवर घेण्यात आलेले राज्यपाल नियुक्त सदस्य राहुल नार्वेकर आणि राम वडकुते यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या विधान परिषदेमधील दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर संघटनेत काम करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आणि युवती राष्ट्रवादीच्या मुंबईच्या अध्यक्षा अदिती नलावडे यांना संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला असल्याची माहिती समोर अली आहे. हे दोघेही तातडीने शुक्रवारी आमदारकीची शपथ घेणार असल्याच बोललं जात आहे.

राष्ट्रवादीने संघटनेत काम करणाऱ्यांना पदावर स्थान द्यायचे ठरविलेले धोरण अमलात आणले आहे. त्यामुसार गर्जे आणि नलावडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. सुरवातीला राष्ट्रवादीकडून अमोल मेटकरी यांना संधी देणार येणार असल्याचे बोलले जात होते. परंतु आता या दोघांची आमदार पदी वर्णी लागणार आहे.

दरम्यान अदिती नलावडे यांनी वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. आक्रमक कार्यकर्त्या म्हणून त्यांचा परिचय आहे. तर शिवाजीराव गर्जे हे राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सर्व कामकाज पाहतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.