लंडन – दक्षिण आफ्रिकेवरील विजयामुळे मनौधैर्य उंचावलेल्या भारतीय संघाची बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी आज ओव्हल मैदानावर गाठ पडणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील अपराजित्व राखण्याकरिता भारताकरिता ही लढत महत्वाची आहे. तर दुसरीकडे पाच वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने यंदाच्या स्पर्धेत अफगाणिस्तान व त्यापाठोपाठ वेस्ट इंडीजविरूध्द विजय मिळवून आपले इरादे स्पष्ट केले आहे.
आजच्या सामन्यात दोन्ही संघानी आपल्या अंतिम 11 मध्ये कोणताही बदल केलेला नसून मागील सामन्यात विजयी संघ कायम ठेवले आहेत. मागील सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरूध्द तर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान व त्यापाठोपाठ वेस्ट इंडीजविरूध्द विजय मिळविला होता.
भारतीय संघ – शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युज़वेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
Match 14. India XI: S Dhawan, R Sharma, V Kohli, KL Rahul, K Jadhav, MS Dhoni, H Pandya, B Kumar, K Yadav, Y Chahal, J Bumrah https://t.co/oXjsq009L9 #IndvAus #CWC19
— BCCI (@BCCI) June 9, 2019
ऑस्ट्रेलिया संघ – डेविड वार्नर, ऐरन फ़िंच, उस्मान ख्वाजा, स्टीव स्मिथ, ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, एलेक्स कैरी, नाथन कूल्टर-नाइल, पैट कमिन्स, मिचेल स्टार्क, एडम ज़म्पा
Match 14. Australia XI: D Warner, A Finch, U Khawaja, S Smith, G Maxwell, M Stoinis, A Carey, N Coulter-Nile, P Cummins, M Starc, A Zampa https://t.co/oXjsq009L9 #IndvAus #CWC19
— BCCI (@BCCI) June 9, 2019