टी-20 मलिकेसाठी “दोन्ही’ संघांची घोषणा

हॅमिल्टन : भारताविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मलिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा झाली असून यामध्ये ऑल राऊंडर डॅरिल मिचेल आणि जलदगती गोलंदाज ब्लेयर टिकनेर यांचा समावेश करण्यात आला आहे. स्थानिक टी-20 स्पर्धा सुपर स्मॅशमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे डॅरिल मिचेल आणि ब्लेयर टिकनेर यांची संघात वर्णी लागली आहे. 6 फेब्रुवारीपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एका टी-20 सामन्यातून बाहेर झालेला केन विलियमसन कर्णधार म्हणून कायम आहे. न्यूझीलंडने 14 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला टी-20 समना हॅमिल्टन, दुसरा ऑकलंड आणि तिसरा सामना हॅमिल्टनमध्ये खेळवला जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

न्यूझीलंड संघ-
केन विलियमसन (कर्णधार), डग ब्रेसवेल, कॉलिन डि ग्रॅण्डहोम, लॉकी फरग्युसन, मार्टीन गप्टील, स्कॉट के, डॅरिल मिचेल, कॉलीन मुन्रो, मिचेल सॅण्टनर, टीम सेयफर्ट, ईश सोदी, टीम साऊदी, रॉस टेलर, ब्लेयर टिकनेर

भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)