अतिक्रमण विभागाला ‘त्या’ दोघींनी दिली आत्महत्येची धमकी

पुणे – हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स रस्त्यावर अनधिकृत चहाचा व्यवसाय करणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी चहा विक्रेत्या दोन महिलांनी पुणे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना विरोध करत स्वत:ला पेटवून घेत आत्मदहनाची धमकी दिली. तसेच अधिकाऱ्यांना अपशब्द वापरत त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी चहा विक्रेत्या दोन महिलांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लता हाके आणि लक्ष्मी हाके असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलांची नावे असून पोलिसांनी आरोपी महिलांना अटक केली आहे. अतिक्रमण विभागाकडून लक्ष्मी लॉन्स रस्ता, कुमार पॅराडाईज जवळ, मगरपट्टा येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनधिकृत पथारी लावलेल्या लोकांवर कारवाई करण्यात येत होती. या ठिकाणी आरोपी महिला चहाचा व्यवसाय करत होत्या. कारवाईवेळी महिलांनी विरोध केला. तसेच खुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अपशब्द वापरून धक्‍काबुक्‍की केली. त्यांच्याबरोबर असलेले पोलीस शिपाई कोंढाळकर यांना देखील धक्‍काबुक्‍की करण्यात आली. तसेच खुडे यांच्या गाडी समोर येत स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याची धमकी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)