BJP vs NCP : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि माढा तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांनी एकत्र येत, भाजप विरूद्ध निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आज राष्ट्रवादी (शप)पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते मेंढापूर येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते-पाटील आणि अभिजीत पाटील यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. यावेळी बोलताना अभिजीत पाटील यांनी, तुम्हाला निधी कुठून मिळणार असे विचारणाऱ्याने आता लक्षात ठेवावे, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या अजितदादांकडेच आहेत, अशा शब्दात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर पलटवार केला आहे. यावेळी बोलताना, खासदार धैर्यशील पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातून भाजपचा सुपडा साफ होईल असे म्हटले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. मागील तीन निवडणुकांप्रमाणे याही निवडणुकीत स्वाभिमानी जनता भाजपचा सुपडा साफ पॅटर्न चालवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, पाटील म्हणाले की, पालकमंत्री जयकुमार गोरे प्रत्येक सभेत यांना निवडून दिले तर निधी कसा आणणार आहेत? असा सवाल करीत असतात. त्यावर, दोन्ही राष्ट्रवादी एक असून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या अजित दादांकडे आहेत हे लक्षात ठेवा, असे त्यांनी म्हटले. पवारांच्या आमदाराचा भाजप पालकमंत्र्यांना थेट इशारा एकंदरीत दोन राष्ट्रवादी एकत्र आल्याने विरोधात असणाऱ्या शरद पवार गटाला आता सत्तेची ताकद मिळाल्याने थेट भाजपलाच आव्हान देण्याचे काम सुरू झाले आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले कल्याणराव काळे यांच्यावर सडकून टीका करताना दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यावर त्यंनी आनंदाने एकत्र राहणे गरजेचे होते. मात्र, सत्ता आपल्या कुटुंबात राहावी यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मी सुटलो कारण काळे जिथे जातात तिथे पडतात आणि आता ते जिथे गेलेत त्यांना पाडणार हे नक्की असे म्हणत पालकमंत्री जरा सावध राहा, असे पाटील यांनी यावेळी इशारा दिला आहे. हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का; ‘या’ माजी आमदाराने सोडली साथ, शिवसेनेत केला प्रवेश