सातारा (प्रतिनिधी)- सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात कराडच्या शनिवार पेठेतील ७५ वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
तसेच काल रात्री मलकापूर (ता. कराड) येथून क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात सारी आजारामुळे दाखल झालेल्या ८५ वर्षीय महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. करोना संशियत म्हणून या महिलेचा नमुना उपचारादरम्यान घेतला असून तो पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.