विस्टन चर्चिल सर्वोत्कृष्ट पंतप्रधान एका सर्वेक्षणातील निष्कर्ष
लंडन : ब्रिटनचे मावळते पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात वाईट पंतप्रधान ठरले असून विंस्टन चर्चिल हे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान ठरले आहेत. ब्रिटनमधील एका संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात हे निष्कर्ष समोर आले आहेत.
इपसोस या मार्केट संशोधन कंपनीने हे सर्वेक्षण केले असून ते 1945 नंतरच्या कालावधीतील ब्रिटिश पंतप्रधान यांच्या कामगिरीचा आढावा यात घेण्यात आला आहे. 49 टक्के लोकांनी बोरीस जॉन्सन हे सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचा कौल दिला आहे. 42 टक्के लोकांनी तेरेसा मे आणि 38 टक्के लोकांनी डेव्हिड कॅमरून यांना सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचा कौल दिला आहे.
तब्बल 62 टक्के लोकांनी ब्रिटनचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान म्हणून सर विन्स्टन चर्चिल यांचा मतदान केले आहे. या सर्व्हेक्षणामध्ये सर्वोत्कृष्ट पंतप्रधान म्हणून मार्गारेट थॅचर यांना 43 टक्के लोकांनी आणि 38 टक्के लोकांनी टोनी ब्लेअर यांना पसंती दर्शवली आहे या सर्वेक्षणामध्ये अकराशे लोकांनी सहभाग दर्शवला होता.