सीमेवरील तणाव : विरोधकांनी केलेली चर्चेची मागणी फेटाळली

नवी दिल्ली – भारत-चीन सीमेवरील तणावाच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा घेण्याची आग्रही मागणी विरोधकांनी केली. मात्र, मोदी सरकारकडून ती फेटाळण्यात आली.

लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक मंगळवारी झाली. त्या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिले.

बैठकीत कॉंग्रेस नेत्यांनी सीमेवरील तणावाच्या स्थितीबाबत चर्चेची मागणी केली. मात्र, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी चर्चेला नकार दर्शवला.

संबंधित मुद्दा संवेदनशील आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत आहे. त्यामुळे त्यावर जाहीर चर्चा होऊ शकत नाही, अशी भूमिका जोशी यांनी मांडली.

Leave A Reply

Your email address will not be published.