Border-Gavaskar Trophy 2024-25 (IND vs AUS) :- पंतप्रधान इलेव्हन संघासोबतच्या सराव सामन्यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज चांगलाच फॉर्ममध्ये दिसला. गुलाबी चेंडूचा सिराजचा पहिलाच सामना होता. या लढतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू मॅथ्यू रेनशॉला तंबूचा रस्ता दाखविला. पर्थ येथे झालेल्या पहिल्या लढतीत देखील सिराजने भन्नाट गोलंदाजी करताना 5 गडी बाद करताना भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. न्यूझीलंड विरुद्ध त्याची कामगिरी अतिशय सुमार राहिली होती. त्याने दोन लढतीत त्याला केवळ २ फलंदाज बाद करता आले होते. सिराजने मात्र, ऑस्ट्रेलियात पुन्हा चमकदार कामगिरी केली. यामागे जसप्रीत बुमराह असल्याचे सिराजने स्पष्ट केले.
न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात 3-0 असे पराभूत झाल्याने भारताच्या खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. या काळात, वेगवान गोलंदाज असलेल्या मोहंम्मद सिराजने बुमराहशी संवाद साधायला. त्यामुळे त्याने पर्थ येथील लढतीत व पंतप्रधान इलेव्हन या दोन लढतीत चांगली कामगिरी केली.
भारताने पंतप्रधान इलेव्हन संघाला 6 गडी राखून पराभूत केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सिराज म्हणाला, मी बुमराहशी सातत्याने बोलतो. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीही मी त्याच्याशी माझ्या गोलंदाजीबद्दल बोललो होतो. त्याने मला विकेट घेण्यासाठी उतावळेपणा करण्यापेक्षा, एका ठराविक टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी करताना खेळाचा आनंद घेण्याचा सल्ला दिला, असे सिराज म्हणाला.
गुलाबी चेंडू वेगळा
ऍडलेडमध्ये 6 डिसेंबरपासून बॉर्डर-गावस्कर करंडकाच्या दुसऱ्या लढतीला सुरुवात होणार आहे. ही लढत गुलाबी चेंडूवर खेळविण्यात येणार आहे. पंतप्रधान इलेव्हन संघासोबत झालेला सामना देखील गुलाबी चेंडूने खेळाला गेला. सिराजने चांगली गोलंदाजी करताना बळी टिपल्याने सिराजचा अंतिम 11 मधील समावेश निश्चित समाजला जात आहे.
गुलाबी चेंडू संदर्भात बोलताना सिराज म्हणाला, गुलाबी चेंडू लाल चेंडूपेक्षा वेगळा असतो. त्याची शिवण घट्ट असते. तो चमकदार देखील असतो. या चेंडूचा तुम्ही जितका जास्त सराव कराल तितके चांगले निकाल तुम्हाला मिळतील. गुलाबी चेंडूने बॅकलेन्थ गोलंदाजी करणे चांगले होईल, अशी अशा देखील सिराजने व्यक्त केली.