हिंजवडी, भारत सरकारचे नॅशनल बुक ट्रस्ट व थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने थेरगाव शिक्षण संकुलाच्या प्रांगणात फिरत्या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
देशभरातील प्रादेशिक भाषेतील ग्रंथ अन्य भाषेत भाषांतरित करून ते वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नॅशनल बुक ट्रस्ट कार्य करत असते. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, मुलांना प्रत्यक्षात ग्रंथ हाताळता यावेत, यासाठी फिरत्या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. तसेच देशभरात अनेक ठिकाणी पुस्तक उत्सव आयोजित केला जातो.
पुणे बुक फेअरच्या पार्श्वभूमीवर या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दोनशे विद्यार्थिनींनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व लेखक श्रीकांत चौगुले यांनी ग्रंथाचे महत्त्व कथन केले. यावेळी एनबीटीचे अधिकारी रवी मोहोळ, सुनंदा सविलगे, योगिता काटे, शुभांगी गायकवाड, नम्रता बेलकर आदी उपस्थित होते.