डच लेखिका मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांना बुकर पुरस्कार

लंडन – 2020 वर्षासाठीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 29 वर्षीय डच लेखिका मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांना घोषित झाला आहे. बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या त्या सर्वात कमी वयाच्या लेखिका ठरल्या आहेत. 

नेदरलॅंडमधल्या ग्रामीण भागातील एका धार्मिक शेतकरी कुंटुबाच्या कहाणीवर आधारित “द डिसकंफर्ट ऑफ ईवनिंग’ या पुस्तकासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची 50 हजार पौंड रक्कम लेखिका आणि अनुवादक मिशेल हचिंसन यांच्यात विभागून दिली जाणार आहे. 

इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेले आणि ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या कोणत्याही भाषेतील कल्पित पुस्तकास दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात येतो. 

हा पुरस्कार मुख्य बुकर पुरस्कारापेक्षा वेगळा आहे आणि जगभरातील दर्जेदार पुस्तके अधिक प्रकाशित करणे आणि वाचली जाणे, यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.