अफगाणिस्तानात अमेरिकेच्या लष्करी रुग्णालयाजवळ बॉम्बस्फोट

काबुल : अफगाणिस्तानात अमेरिकेच्या लष्करी रुग्णालयाजवळ झालेल्या एका बॉम्बस्फोटामध्ये किमान 1 जण ठार झाला आणि किमान डझनभर जखमी झाले आहेत. पारवान प्रांतातील बारग्राम येथील हवाई तळाजवळ बांधकाम सुरू असलेल्या रुग्णालयाजवळच हा स्फोट झाला. आतापर्यंत कोणत्याही गटाने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

या स्फोटात एक महिला मरण पावली तर किमान 60 जण जखमी झाले. स्फोटामुळे जवळपासच्या घरांचे नुकसान झाले त्यामध्येच हे लोक जखमी झाले. हा एक आत्मघातकी कार बॉम्बचा स्फोट होता, असे जिल्ह्याचे गव्हर्नर अब्दुल शुकूर कुदोसी यांनी सांगितले. काही सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारानंतर हा स्फोट घडवला गेल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 28 नोव्हेंबर रोजी आपल्या सैन्याला “थॅंक्‍स गिव्हिंग डे’साजरा करण्यासाठी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांच्याशी भेट घेण्यासाठी बारग्राम येथे अचानक भेट दिली होती.

अफ्गाणिस्तानातील युद्ध संपवण्याच्या उद्देशाने केले जात असलेले सर्व उच्चस्तरिय सहकार्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवल्याच्या तीन महिन्यांनंतर हा बॉम्बस्फोट झाला आहे. ट्रम्प यांनी शनिवारीच तालिबानबरोबरची चर्चा पुन्हा सुरू केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.