नवी मुंबई : नवी मुंबईमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतील वाशी येथील इनॉर्बिट मॉल बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. धमकीचा मेल आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
हा मेल प्राप्त होताच इनॉर्बिट मॉल परिसरात मोठा पोलीस कडकबंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांनी संपूर्ण मॉल रिकामा केला आहे. मॉलमधील सर्व स्टाफ आणि ग्राहकांना मॉलबाहेर सुरक्षित काढण्यात आलं आहे. बॉम्ब पथक दाखल झाले असून मॉलमध्ये बॉम्ब कुठे ठेवलाय का याचा शोध सुरू आहे.
याआधी देखील मिळाली होती धमकी
यापूर्वी मुंबई विमानतळ, मुंबई पोलिसांनाही अशा प्रकारची धमकी आली होती. मेलवरूनच ही धमकी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा गणेशोत्सवाआधी अशाप्रकारची धमकी आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा मेक कुणी पाठवला? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.