पाकिस्तान : दहशतवादी हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट; दोघांचा मृत्यू ,१७ जखमी

लाहोर – लाहोर शहरात दशतवादी हाफिज सईदच्या घराजवळ जौहर टाउन परिसरात शक्तीशाली स्फोट झाल्याची मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये  दोन जणांचा मृत्यू झाला तर, 17 जण जखमी झाले आहेत.  जखमींची संख्या वाढण्याची भीती आहे. स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी बॉम्बशोधक पथक व पोलीस दाखल झाले आहेत.

लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या घरासमोर हा स्फोट झाला. लाहोर शहरातील जोहार टाऊन भागात असलेल्या अकबर चौकात बुधवारी स्फोट झाला. या घटनेबाबत पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्रातून माहिती समोर आली आहे.

या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून 17  जण जखमी झाले आहेत.  घटनेत जखमी झालेल्या सर्वांना जिना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमींमध्ये महिला आणि मुलांचा समावेश असल्याचे लाहोर पोलिसांनी म्हटलं आहे.

स्फोट इतका भयंकर होता की परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. तर एक इमारत पूर्णपणे कोसळली आहे. जवळपासच्या गाड्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार यात अद्याप १२ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या स्फोटामागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

स्फोटाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास केला जात असून, मदत कार्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.