नवी दिल्ली – दिल्लीतील असलेल्या इस्रायलच्या दुतावासाहेर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. बॉम्ब स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी दाखल झालं. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहितीही समोर आली आहे. दिल्लीत सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी हिंसा झाली होती. त्यात बॉम्बस्फोट झाल्याने पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
A low-intensity explosion happened near the Israel Embassy in Delhi, nature of explosion being ascertained. Some broken glasses at spot. No injuries reported; further investigation underway pic.twitter.com/xqIllrCZOQ
— ANI (@ANI) January 29, 2021
इस्रायलच्या दुतावासापासून १५० मीटर अंतरावर काही गाड्या उभ्या होत्या. याच ठिकाणी हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुरूवातीच्या तपासात यामागे काही समजाकंटक असल्याचं दिसून येत आहे,” अशी माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली.
#WATCH | Delhi Police team near the Israel Embassy where a low-intensity explosion happened.
Nature of explosion being ascertained. Some broken glasses at the spot. No injuries reported; further investigation underway pic.twitter.com/RphSggzeOa
— ANI (@ANI) January 29, 2021
आम्हाला ५ वाजून ४५ मिनिटांनी या ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती मिळाली. यानंतर आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचलो. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही,” असं अग्नीशमन विभागाचे अधिकारी प्रेम पाल यांनी सांगितलं. हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मानला जातो.